कोरोना संसर्गामुळे शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांना शासन निर्णयाची व शेतीविषयक योजनांची माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करतात. शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यास विलंब होत होता. परिणामी शेतकरी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत असल्याचे गुडघे यांनी निवेदनात म्हटले आहे. केंद्र शासनाचा कृषी विभाग शेतकरी हितासाठी परिपत्रक काढते मात्र, स्थानिक स्तरावर अधिकारी याची दखल घेत नसल्याने केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनेपासून शेतकरी वंचित राहत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत तीन लाखांपर्यंत कर्ज मिळावे म्हणून किसान क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज संबंधित विभागाकडे दाखल केले आहेत. संबंधित बँक अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत किसान क्रेडिट कार्ड योजना बारगळण्याची शक्यता निर्माण झाल्याने याप्रकरणी तात्काळ दखल घेण्याची मागणीही निवेदनात गुडघे यांनी केली आहे.
शेतकर्यांना किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 4:09 AM