दुष्काळी भागातील शेतकऱ्यांपर्यत सर्वच योजना पोहचल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल होत आहेत. दुष्काळी योजना फक्त कागदावरच दिसत आहेत. दुष्काळग्रस्त शेतकºयांना सवलती लागू कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यात जमीन महसुलात घट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात साडे तेहतीस टक्के सुट, विद्यार्थ्याच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅँकरचा पुरवठा, टंचाई जाहीर केलेल्या शेतकºयांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे तेथील किती विहीरी अधिग्रहीत केल्या व किती टॅँकर सुरु केले यांची माहिती द्यावी, तालुक्यातील पशुधनास एप्रिल २०१९ पर्यंत पुरेल एवढा पुरेसा चारा उपलब्ध करुन द्यावा आदिंचा समावेश आहे. निवेदनावर शहराध्यक्ष रविंद्र बागुल, नितीन उशीर, श्रीहरी ठाकरे, दिगंबर गांगुर्डे, भागवत झाल्टे, भरत क्षत्रिय आदिंसह मनसे कार्यकर्त्याच्या सह्या आहेत.
चांदवड तालुक्यात दुष्काळी उपाययोजना करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 5:46 PM