शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सुकामेव्याच्या मागणीत झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:02 AM

शहरात थंडीचे आगमन होत असतानाच सुकामेव्याच्या पदार्थांनी बाजारपेठ सजण्यास सुरु वात झाली आहे. थंडीचा पारा १४ अंशांपर्यंत घसरल्यामुळे बाजारात नागरिकांकडूनही सुकामेव्याची मागणी केली जात आहे.

नाशिक : शहरात थंडीचे आगमन होत असतानाच सुकामेव्याच्या पदार्थांनी बाजारपेठ सजण्यास सुरु वात झाली आहे. थंडीचा पारा १४ अंशांपर्यंत घसरल्यामुळे बाजारात नागरिकांकडूनही सुकामेव्याची मागणी केली जात आहे. यात खारीकचे दर ३७० कलम हटविल्यामुळे बाजारात खारीक २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच शहरातील तापमान घसरण्यास सुरुवात झाली होती. मात्र गेल्या एक दोन दिवसांपासून तापमान सतत घसरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरात पहाटेच्या सुमारास फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य संवर्धनासाठी उबदार कपड्यांबरोबरच सुकामेवा खरेदी करण्यासही प्रारंभ केला आहे. खास करून डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सुकामेव्यास नाशिकमध्ये मोठी मागणी असते. सुकामेव्याच्या खरेदीला विशेषत: डिसेंबरमध्ये प्रतिसाद मिळतो. परंतु, यंदा डिसेंबरमध्ये जाणवणाºया थंडीचे आगमन नोव्हेंबर महिन्यातच जाणवू लागले आहे. सुकामेव्याला आरोग्यसंवर्धासाठी विशेष महत्त्व आहे. त्यामुळे बाजारात सुकामेव्याची मागणी वाढू लागली आहे.इतर देशांतून करावी लागते खारीक आयातकेंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी काश्मीरमध्ये लावण्यात आलेला ३७० कलम हटविल्यामुळे पाकिस्तानमधून भारतात काही गोष्टींची निर्यात बंद करण्यात आली होती. खारीक ही मुख्यत: पाकिस्तानमधून भारतात येत असते. मात्र सध्या पाकिस्तानची खारीक भारतात येणे बंद झाल्याने इतर देशांतून खारीक आयात करावी लागत आहे. त्यामुळे खारीकचे दर मागील वर्षीच्या तुलनेत तिप्पटीने वाढली आहे.असे आहेत दर (प्रतिकिलो)खारीक : २५० ते ३००अक्रोड : ६५० ते ७५०बदाम : ७५० ते ९००काजू : ८०० ते ११००काळा मनुका : ४०० ते ६००साधा मनुका : १८० ते २४०खारे पिस्ता : १००० ते १४००अंजीर : ९०० ते १३००डिंक : १८० ते २००खोबरे : २०० ते २२०साधे खजूर : १२० ते १५०काळे खजूर : ३०० ते ३४०थंडीची चाहुल लागल्यामुळे ग्राहक सुकामेव्याच्या खरेदीला पसंती देत आहे. यात खारीक, खोबरे, काजू, बदाम, मनुका यांना मोठी मागणी आहे. मात्र येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असल्याने सुकामेव्याच्या मागणीत अधिकच वाढ होणार आहे.- जयंत पटेल, सुकामेवा विक्रेते

टॅग्स :environmentपर्यावरणHealthआरोग्य