नाशिकरोड : वीर सावरकर उड्डाण पुलाखालील पार्किंगच्या जागेतील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे, अशी मागणी नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेने दिलेल्या निवेदनात केली आहे.महापौर रंजना भानसी यांना नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावरकर उड्डाण पुलाखाली पार्किंगसाठी जागा ठेवण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी अनधिकृतपणे विविध वस्तू विक्रीची दुकाने, हातगाडे आदी थाटण्यात आली आहे. यामुळे वृत्तपत्र विक्रेते व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उड्डाण पुलाखालील पार्किंगच्या जागेवर असलेले अतिक्रमण त्वरित हटवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अध्यक्ष सुनील मगर, उपाध्यक्ष महेश कुलथे, सरचिटणीस गौतम सोनवणे, खजिनदार वसंत घोडे, किशोर सोनवणे, विजय सोनार, भारत माळवे, अनिल अहेर, रवि सोनवणे, मोहन कºहाडकर, योगेश भट, जय भालेराव, हर्षल ठोसर, ज्ञानेश्वर गवळी, दत्ता मिराणे, इब्राहीम पठाण, बाबासाहेब ओहोळ, कुंदन वाघ, संतोष गवळी, विकास रहाडे, माळवे काका, सिद्धार्थ पगारे, शैलेश शिंदे, हेमंत पोटे, दिनेश पवार, मनोहर खोले, सुनील सूर्यवंशी, राजेंद्र शिंदे, संजय चव्हाण, सोमनाथ डावरे आदिंच्या सह्या आहेत.
उड्डाण पुलाखालील अतिक्रमण काढण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:47 AM