र्यंबकेश्वर : शंकरानंद सरस्वती यांचा आक्षेपत्र्यंबकेश्वर : शहरात लवकरच अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. तत्पूर्वी येथील घरांची मोजणी करून अतिक्रमण केलेली बांधकामे काढण्यात येणार असून, अनेक घरांवर नगर परिषदेचा हातोडा चालणार आहे. त्यामुळे येथील गोरगरिबांवर बेघर होण्याची वेळ आल्याने आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती ऊर्फ भगवान बाबा यांनी या मोहिमेवर टीका करत, प्रथम म्हातारओहळातील अतिक्रमणे काढा आणि नंतर गरिबांच्या घरांना हात लावा, असे खडे बोल नगर परिषद प्रशासनाला सुनावले आहेत. शहरातील विविध भागात अनेक गरीब कुटुंबांनी संसार थाटले असून, यातील झोपड्यांना नगर परिषदेने मूलभूत सोयीसुविधा देऊन तात्त्विक स्वरूपात मान्यता दिली आहे. मात्र नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत या झोपड्यांवर हातोडा चालणार असल्याने येथील आनंद आखाड्याचे शंकरानंद सरस्वती यांनी आक्षेप नोंदवला आहे. दुसरीकडे शहरातील म्हातारओहळ व नीलगंगा या नाल्यांचा प्रवाह एकत्र होऊन नदीचे स्वरूप प्राप्त होऊन गोदावरी प्रवाहित होते. मात्र, याच नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली आहेत. सीताराम आश्रमापासून ते थेट कुशावर्त चौकापर्यंत वाहणाऱ्या या नाल्यांवर अनेक अतिक्रमणे आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने अगोदर या अतिक्रमणांची मोजणी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यानंतरच गरिबांच्या घरांची मोजणी करावी, असे शंकरानंद सरस्वती म्हणाले. गरिबांच्या घरांचेच मोजमाप करून त्यांच्यावरच कारवाई करणे म्हणजे त्यांच्याविषयी ही सापत्न वागणूक ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर) ’ नाशिक : शरणपूररोडवरील व्यावसायिक इमारतीभोवती दुचाकी, चारचाकी वाहनांचा विळखा पडल्याचे दिसते. इमारतीच्या नियोजित पार्किंगमध्ये वाहने उभी असतातच; मात्र इमारतीच्या चारही बाजूंनी वाहनांचा वेढा पडल्याचे दिसते.
अतिक्रमणाची मोजणी करण्याची मागणीत्
By admin | Published: December 10, 2015 11:20 PM