नाशिक : जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थिती लक्षात घेता दुष्काळी भागात अधिक पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर बाब लक्षात घेता जिल्ह्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा कालावधी वाढवून तो ३१ जुलैपर्यंत करण्यात यावा, असा ठराव जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीने केला असून, याबाबतच पत्र अध्यक्ष शीतल सांगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. जिल्हा परिषदेची जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सभा जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत जिल्ह्णातील टॅँकरची सद्य:स्थिती व पर्जन्यमानाबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्णातील पर्जन्यमान अल्प असल्याबाबत उपस्थितीत समिती सदस्य व अधिकारी यांनी माहिती दिली. काही ठिकाणी थोड्याफार झालेल्या पावसानंतर कपाशी व तत्सम खरीप पिकांची पेरणी तथा लागवड करण्यात आल्याची माहिती दिली. परंतु सद्य:स्थितीत पाऊस अत्यल्प असल्यामुळे खरीप पिकांची लागवड उन्हामुळे करपून गेल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्णातील टॅँकर पुरवठ्याची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविणे अपेक्षित असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समिती सभेत झाली. उपस्थित अधिकाºयांनी घेतलेल्या माहितीनुसार ३०जूनपर्यंत पुरेसा पाऊस न झाल्यास जिल्ह्णातील अतिदुर्गम भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन टॅँकर पुरवठ्याला मुदतवाढ देण्याचा ठराव करण्यात येऊन त्याबाबतची मागणीजिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पाऊस २५ जूननंतर सुरू होणार आहे. शासनाच्या नियमानुसार नाशिक जिल्ह्णात टंचाई अंतर्गत पुरविण्यात आलेले पिण्याच्या पाण्याचे टॅँकर दि. ३० जून २०१८ अखेरपर्यंत मुदत असल्याचे कळविले आहे. परंतु जिल्ह्णातील पर्जन्यमानाची स्थिती माहिती असता जिल्ह्णात अत्यल्प पाऊस असल्यामुळे सद्य:स्थितीतील पिण्याच्या पाण्याची टंचाई पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे.
टॅँकरला मुदतवाढ देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:40 AM