उमराणे : येथील तालुका बीजगुणन केंद्रात विविध शेतोपयोगी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने निवेदनाद्वारे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली आहे.उमराणे येथे तालुका बीजगुणन केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून कृषी विभागाच्या माध्यमातून कार्यान्वित आहे. या केंद्राचे एकूण क्षेत्र ६७ एकर आहे. या केंद्रात पूर्वी सर्व प्रकारच्या फळझाडांच्या बागा होत्या. तसेच शेतोपयोगी बी-बियाणांची निर्मिती या केंद्रात मोठ्या प्रमाणावर केली जात होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या केंद्राचा फायदा होत होता. कालांतराने रोपवाटिका बंद होऊन रोपांची निर्मिती ठप्प झाली. परिणामी येथील फळबागा उद्ध्वस्त होऊन बी-बियाणे निर्मिती बंद पडली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. बीजगुणन केंद्राचे पुनर्जीवन होण्याची अत्यंत गरज आहे. येथील तालुका बीजगुणन केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत शाश्वत शेतीच्या बळकटीकरणासाठी सदर केंद्राचा विकास होणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
बीजगुणन केंद्रात सुविधांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:02 PM
उमराणे : येथील तालुका बीजगुणन केंद्रात विविध शेतोपयोगी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने निवेदनाद्वारे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली आहे.
ठळक मुद्देबीजगुणन केंद्राचे पुनर्जीवन होण्याची अत्यंत गरज आहे.