दिल्ली येथे ९ आॅगस्ट रोजी काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळण्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. याचा निषेध नोंदवत विविध पक्ष व संघटनांनी तहसीलदार नितीन गवळी व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना निवेदन दिले. राष्टÑवादी युवक कॉँग्रेसच्यावतीने डॉ. विष्णू अत्रे, प्रवीण जगताप, जयराम शिंदे, निखिल गडाख, राजाराम मुरकुटे, मेघा दराडे, दीपक लहामगे, युनूस शेख, बाळासाहेब आव्हाड, राजेंद्र मिठे, डॉ. संदीप लोंढे, राजेंद्र जगझाप यांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तहसीलदार नितीन गवळी यांना या घटनेचा निषेध नोंदवित असल्याचे निवेदन देऊन समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली. निवेदनावर नामदेव कोतवाल, हरिभाऊ तांबे, सोपान उगले यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहेत. आरपीआयकडून या घटनेचा निषेध नोंदविण्यासह समाजकंटकांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर आरपीआयचे तालुकाध्यक्ष मंगेश जाधव, आशाताई जाधव, कल्पना रणशेवरे, वनिता जगताप, संजय जाधव, प्रकाश शिरसाठ, रमेश जाधव, भीमराव आढाव यांच्यासह आरपीआय कार्यकर्त्यांची नावे आहेत. भारिप बहुजन महासंघाच्यावतीने प्रवीण मोरे, प्रवीण जाधव, विजय मोरे, एम. एम. जाधव, बळवंत जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन देण्यात आले. बहुजन विकास श्रमिक संघटनेच्यावतीनेही या घटनेचा निषेध नोंदवित पोलीस व महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनावर मनोहर दोडके, रोहित पवार, सुनील जगताप, आकाश सोनवणे, सचिन डेंगळे, आकाश वाघ, सुधाकर चंद्रमोरे, भीमराव जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांची नावे आहेत.