मानोरी : येवला तालुक्याच्या पश्चिम भागात दीड महिना उलटून गेला तरी जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालखेड आवर्तनाच्या पाण्याने बंधारे भरून देण्याची मागणी होत आहे.मानोरी बुद्रुक,मुखेड,देशमाने,खडकीमाळ आदि गावातील व परिसरातील शेतकरी दमदार ,मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. येथील शेतकºयांनी मे महिन्याच्या अखेरीस हवामान खात्याने दिलेल्या अंदाजावर खरीप हंगामातील पिकांच्या तयारीला लागले होते. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेताºयांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. मोठा पाऊस नाही, त्यातच उन्हाच्या तीव्रतेमुळे मका,सोयाबीन,टोमटो,भूईमुग या पिकांना पाण्याची नितांत गरज भासत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे मका ,सायोबीनची पिके करपू लागले असून झाडांचे शेंडे सुकण्यास सुरु वात झाली आहे. यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दृश्य मानोरी बुद्रुक,देशमाने आदि परिसरात सध्या दिसत आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनातून पिकांना पाणी सेण्याची मागणी होत आहे.
पालखेड आवर्तनातून बंधारे भरून देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 6:23 PM
मानोरी : येवला तालुक्याच्या पश्चिम भागात दीड महिना उलटून गेला तरी जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालखेड आवर्तनाच्या पाण्याने बंधारे भरून देण्याची मागणी होत आहे.
ठळक मुद्देपावसाची प्रतिक्षा : दुबार पेरणीची टांगती तलवार