शासनाने आता निर्बंधांमध्ये शिथिलता आणली असली तरी हॉटेल, रेस्टॉरंट ग्राहकांसाठी खुले झालेले नाहीत. शासनाने हॉटेल व्यवसायाचा विचार करता हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना परवानगी द्यावी, हॉटेल व्यावसायिक, कारागीर व कामगारांचे प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करावे, आदी मागण्याही सदर पत्रकात करण्यात आल्या आहेत.
सदर प्रसिद्धीपत्रकावर असोसिएशनचे अध्यक्ष योगेश तक्ते, उपाध्यक्ष दीपक गुप्ता, सचिव योगेंद्र वाघ, सहसचिव सागर नाईकवाडे, खजिनदार सुभाष गांगुर्डे, सहखजिनदार संजय पवार, कार्यकारिणी सदस्य निरंजन परदेशी, बद्रिनाथ तांदळे, सुरेश खैरमोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कोट
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात हॉटेल व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक छोटी-मोठी हॉटेल्स बंद पडल्याने व्यावसायिक- कारागिरांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत वा पॅकेज द्यावे.
- योगेश तक्ते, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन, येवला