खरीप हंगामामध्ये विंचूर व परिसरात अल्प पाऊस झाल्याने जनावरांच्या चाºयाची कमतरता भासत आहे. विंचूरमध्ये पाच दूध संकलन केंद्र असून दररोज तेरा ते पंधरा हजार लिटर दूध पंचक्र ोशितील शेतकरी व दुग्ध व्यावसायिकांकडून केली जाते. बहुतांश कुटुंब ही दुग्ध व्यवसायावर उदरनिर्वाह करीत आहेत. पाण्याची पातळीही खोल गेली असल्याने दूध उत्पादक शेतक-यांची चा-याअभावी वणवण होत आहे. सदर बाब चार-पाच दिवसांपूर्वी दुष्काळी दौºयावर आलेले पालक मंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार परिसरातील उपलब्ध असणा-या जनावरांच्या चा-याची छावणी लवकर सुरु करावी असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष संजय वाबळे, माजी सरपंच मधुकर दरेकर, विष्णुनगरचे सरपंच किशोर मवाळ, तलाठी सागर शिर्केआदी उपस्थित होते.
विंचूरसह परिसरात चारा छावणी सुरु करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 6:04 PM