सोयगाव : सोयगाव, कॉलनी एरियातील जनता आता मेटाकुटीस आली असून प्रशासना विरोधात संताप व्यक्त होत आहे. परिसरातील लोकांच्या वैद्यकीय खर्चात वाढ झाली असून शारीरिक व्याधी जडल्याने लहानथोर वैतागले आहेत.सोयगाव ते डि.के चौकापर्यंत चा एक कि.मी चा रस्ता. ह्याच मार्गाने रोज जवळपास चार ते पाच हजार नागरिक दररोज ये-जा करतात. वाहनचालकांसोबतच पादचारी देखील त्रस्त झाले. ह्या मार्गाने जीव मुठीत धरून जाण्याची वेळ परिसरातील नागरिकांवर आली आहे.रस्त्याचे एक कि. मी पेक्षाही कमी अंतर असले तरी नरकाचा रस्ता बनला आहे.चांगला रस्ता शोधूनही सापडणार नाही.जागोजागी खड्डे,दगडधोंडे पडलेले आहेत. .त्यात रहदारीमुळे प्रचंड प्रमाणात धूळ इथे असून नागरिकांना श्वसनाचे त्रास जडलेत.सोयगाव ते डि.के चौकापर्यंत च्या रस्त्यावर सर्वात जास्त त्रास अवजड वाहनांचा होत आहे.ह्या मार्गाने सतत अवजड वाहनांची ये जा चालू असते./ट्रक,डंपर,ट्रॅक्टर,मोठमोठे कंटेनर देखील यामार्गाने जातात त्यामुळे अवजड वाहन गेल्यास वाहनामागे मोठ्या प्रमाणात धुरळा उडतो. तो धुरळा दहा ते पंधरा मिनिटे परिसरात असतो.शिवाय तासाला वीस ते पंचवीस ट्रक सहज जातात.शिवाय अवजड वाहनांमुळे व खराब रस्त्यामुळे एखाद्या दुचाकीस्वाराचा तोल जाऊन जीव जाण्याची शक्यता आहे.शाळा,कॉलेजेस हाकेच्या अंतरावर असल्याने शालेय विद्यार्थी ह्याच मार्गाने सायकल द्वारे शाळेत जा ये करतात त्यामुळे अवजड वाहन,खराब रस्ते यात विद्यार्थी जीवित हानी होऊन मोठे संकटं निर्माण होऊ शकते.परिसरातील नागरिक ह्या रस्त्याला,असुविधेला त्रस्त, कंटाळलेले असून जर तुमच्या कडून रस्ता होत नसेल तर किमान अवजड वाहन बंदी घालावी अशी मागणी होत आहे.
सोयगावात अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2022 12:25 AM
सोयगाव : सोयगाव, कॉलनी एरियातील जनता आता मेटाकुटीस आली असून प्रशासना विरोधात संताप व्यक्त होत आहे. परिसरातील लोकांच्या वैद्यकीय खर्चात वाढ झाली असून शारीरिक व्याधी जडल्याने लहानथोर वैतागले आहेत.
ठळक मुद्देनसेल होत रस्ता तर जाऊ द्या.