शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

ग्राहकांची विदेशी फळांना मागणी

By admin | Published: December 27, 2015 10:05 PM

द्राक्षांची आवक सुरू : चीनचे ड्रॅगन फळ उपलब्ध

नाशिक :सध्या बाजारात देशी-विदेशी फळे उपलब्ध आहेत. थंडीचे दिवस सुरू झाले की सफरचंद, द्राक्षे आणि स्ट्रॉबेरीचे ग्राहकांना आकर्षण असते. यंदा बाजारात चीनचे ड्रॅगन फळ उपलब्ध झाले आहे. या फळाचे गुणधर्म रक्तवाढ आणि पांढऱ्यापेशी कमी असल्यास वाढविणे हे आहे. याची किंमत प्रतिनग १२0 रुपये आहे. ग्राहकांच्या पहिल्या पसंतीचे हे फळ ठरले आहे. न्यूझीलंडच्या किवी फळातदेखील ड्रॅगनचेच गुणधर्म आहेत. या फळाची किंमत प्रतिनग ३0 रुपये आहे. सर्वांत जास्त मागणी असणारे सफरचंद आहे. सफरचंदमध्ये किन्नोर १४0 रु. किलो, वॉशिंग्टन १८0 रु. किलो, फ्युजी २00 रुपये किलो, काश्मिरी सफरचंदला मागणी असून, सर्वांत जास्त विक्री आहे. महाबळेश्वरची प्रसिद्ध स्ट्रॉबेरीदेखील बाजारात उपलब्ध झाली आहे. स्ट्रॉबेरीची किंमत ५0 रुपये २00 ग्रॅम आहे. ड्रॅगन व किवी फळाबरोबर आॅस्ट्रेलियाचे आलुबुखार रक्तवाढीसाठी गुणकारी असल्याने ३00 रु. किलोने उपलब्ध झाले आहे. थायलंडच्या चिंचेने ग्राहकांच्या जिभेला पाणी सुटत आहे. चिंचेची किंमत ८0 रु. प्रति २५0 ग्रॅम आहे.आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप वेळ असला तरी हैदराबादचा लालबाग आंबा ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या आंब्याची आवक मात्र कमी आहे. याची किंमत १५0 रु. किलो आहे. भद्रकाली फळबाजारात हे फळ उपलब्ध आहे. नाशिकच्या द्राक्षाबरोबरच विदेशी द्राक्षाचीदेखील बाजारात आवक होत आहे. विदेशी द्राक्षांची किंमत आवाक्याबाहेरची आहे. कॅलिफोर्नियाचे रेडग्लोब व ब्लॅकग्रेप्स बाजारात उपलब्ध आहे. रेडग्लोबची किंमत ३५0 रु. आणि ब्लॅकग्रेप्सची किंमत ४५0 रुपये प्रतिकिलो आहे. संत्र्याला बाजारभाव नसल्याने २0 रु. किलोने ग्राहकांना मिळत आहे. अपवाद पंजाबची संत्री ८0 रु. प्रतिकिलो दराने मिळत आहे. सोलापूर व पुणे येथून द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. ग्राहकांना हे द्राक्षे विदेशी द्राक्षांच्या दरापेक्षा कमी दरात उपलब्ध होतील, असे फळ विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.डाळिंबाच्या भावात घटडाळिंबाला बाजार नसल्याने शेंद्री व मृदुला डाळींब ८0 रु. प्रतिकिलोने मिळत आहे. बाजारात विविध फळांची आवक सुरू झाली आहे. ग्राहक थंडीमध्ये फळांची जास्त प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे फळांची दुकाने विविध फळांनी भरलेली दिसत आहे. फळविक्रेत्यांमध्ये विक्री वाढल्याने आनंदाचे वातावरण दिसत आहे. फळविक्रेत्यांच्या दुकानांबरोबर हातगाडीवर फळविक्री करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढलेली दिसत आहे. ग्राहकांना आपल्या परिसरातच फळांची खरेदी करता येत आहे. हातगाडीवर बोरे विकताना विक्रेते जास्त प्रमाणात दिसत आहेत. संपूर्ण बाजाराचा आढावा घेतला असता विदेशी फळे महाग आहेत. तरी त्यांची मागणी वाढत आहे. नाशिकमधील भद्रकाली फळ बाजारात देशी-विदेशी फळे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.