लोकमत न्यूज नेटवर्कअंदरसूल : कोरोनाने शेती व्यवसाय देखिल संकटात आला असून सर्वच शेतमालाचे भाव गडगडले आहेत, त्यात आता वादळी पावसाची भर पडल्याने शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी शेती व्यवसायाला घरघर लागली आहे. कांद्याला हमी भाव देवून सर्व बाजार समित्यांमध्ये शेतमाल लिलाव सुरळीत सुरू राहावे यासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकरीऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.शेतकरीवर्गाने चांगल्या भावाच्या अपेक्षेने कांदा चाळीत साठवून ठेवला. कांद्याला चांगला दर मिळेल असे वाटत असतांना पाऊस सुरू झाला. पाऊस व त्यानिमित्ताने बदललेल्या वातावरणाने चाळीतील कांदा खराब होवू लागला. पिक पेरणीसाठी, खतांसाठी भांडवलाची गरज असतांना साठवलेला कांदा शेतकरी विक्र ीसाठी बाजारात आणत असतात. पण या वर्षी कोरोनाचा प्रार्दुभाव व त्यापाठोपाठ वादळी पाऊस या संकटाने कांदा बळी जात आहे. परिणामी शेतकऱ्यांपुढे मातीमोल भावात कांदा विक्र ी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. बाजार समित्या चालू- बंद होत राहिल्याने शेतकरी माल असून विक्र ी करू शकला नाही. पावसातही शेतकरी कांदा विक्र ीसाठी बाजारसमितीत आणत होते मात्र, सलग चार दिवस वेगवेगळ्या कारणाने समित्या बंद राहिल्या. तसेच लगतच्या वैजापूर व कोपरगाव बाजार समितीही कोरोनामुळे बंदच आहे.सोमवारी, (दि. २७) फक्त अंदरसुल उपबाजार आवारात उन्हाळ कांदा लिलाव झाले. सर्वसाधारणपणे अंदरसुल उपबाजार आवारात उन्हाळ कांदा शंभर-दीडशेच्या वर ट्रॅक्टर येत नाही. पण सोमवारी येवल्यासह वैजापूर, कोपरगाव तालुक्यातून मोठी आवक झाल्याने ५००च्या पुढे टॅ्रक्टर आवक झाली. आवक वाढल्याने बाजारभाव घसरतात या नियमाने भावात मंदी आली. कांद्याला हमी भाव देवून सर्व बाजार समित्यांमध्ये शेतमाल लिलाव सुरळीत सुरू राहावे यासाठी शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.चौकट-पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कांदा खराब झाला आहे. कांद्याला भाव नाही, बाजार समित्या बंद, यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने सर्व बाजार समित्या नियमीत व सुरळीत सुरू रहाव्यात यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतमालांचे लिलाव सुरळीत झाल्यास शेतकºयांना थोडासा दिलासा तरी मिळेल.- मकरंद सोनवणे, सभापती, उपबाजार आवार, अंदरसूल.(फोटो २७ मार्केट यार्ड)
सुरळीत शेतमाल लिलावासाठी शासन हस्तक्षेपाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 5:25 PM