सुरगाणा : तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विकून ५ कोटी रुपयांचा गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायवाई करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीचे नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हाअध्यक्ष तुळशीराम खोटरे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष नीलेश गावित यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे. सुरगाणा सारख्या आदिवासी तालुक्यात दोन दलित गोरगरीब जनतेसाठी थेट घरपोच योजना राबविली होती. त्याच तालुक्यात पाच ते सहा महिन्यापासून धान्य मिळत नव्हते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर हा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. यामध्ये सात जणांवर गुन्हे दाखल झाले असून, तहसीलदारासह चार जणांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्याचबरोबर या काळाबाजार करणाऱ्यांमध्ये वितरण व्यवस्थेथील खालच्या स्तरावरील यंत्रणा सहभागी असू शकते. याची सखोल चौकशी करून सामील असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
धान्य घोटाळा कायवाईची मागणी
By admin | Published: February 02, 2015 12:29 AM