देवळा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाळीत साठवणूक केलेला उन्हाळ कांदा शिल्लक असून, कांद्याच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे अनेक शेतकरी कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शिल्लक असलेल्या उन्हाळ कांद्याला १०००रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तालुक्यातील भऊर, वाजगाव, लोहोणेर, खामखेडा, सावकी, वासोळ, मेशी, दहिवड, उमराणे, वडाळे, कनकापूर, खर्डा आदी गावांतील शेतकºयांनी दुष्काळ तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात चाळीत कांदा साठवणूक करून ठेवला आहे.मध्यंतरी उन्हाळ कांद्याचे भाव काहीकाळासाठी दोन हजार रु पये प्रतिक्विंटलपर्यंत गेले होते. शेतकºयांना कांदा विक्र ीतून आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी हा भावयोग्य होता. परंतु त्यावेळी कांदा विकण्याची घाई करू नका, पुढच्या काळात आणखीभाववाढतील असे भाकीत वर्तविले गेलेहोते. सोशल मीडियावर शेकडो स्वयंघोषित तज्ज्ञांनी याबाबत उलटसुलट पोस्ट टाकून चुकीचे संदेश सर्वत्र पसरवले. यामुळे शेतकरी द्विधा मन:स्थितीत सापडला. कांद्याचे भाव अजूनवाढतील असा आशावाद बाळगत त्याने कांदा विक्रीसाठी योग्य परिस्थिती असतानादेखील कांद्याची साठवणूक केली.याबाबत अनेक शेतकºयांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होते; परंतु याच काळात पोळ कांदा बाजारात दाखल झाल्याने उन्हाळ कांद्याचे भाव वाढण्याऐवजी सातत्याने कोसळतराहिले. उन्हाळ कांद्याची मागणी घटल्यामुळे मातीमोल भावाने तो विकण्याची वेळ शेतकºयांवर आली. यामुळे या शेतकºयांना कुटुंबातील सदस्यांची बोलणी ऐकावी लागून मनस्ताप सहन करावा लागत आहे.अनेक ठिकाणी शेतकºयांचा उद्रेक बघावयास मिळाला. तालुक्यातील सटवाईवाडी येथील शेतकरी पंढरीनाथ मेधने यांनी लिलावात उन्हाळी कांदा १०५ रुपये प्रतिक्विंटल पुकारल्यामुळे उद्विग्न होत विक्र ीसाठी आणलेलादोन ट्रॉली कांदा देवळा येथील पाच कंदील चौकात विंचूर-प्रकाशा महामार्गावर ओतून शासनापर्यंत शेतकºयांच्या भावना पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
कांद्याला अनुदान देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 6:31 PM