नाशिक : लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे दरात थोडी घट झाल्याने हापूस आंब्याची मागणीदेखील वाढली आहे. महिन्याभरापूर्वी दोनशे रुपये किलोचा हापूस आंबा आता शंभर रुपये असा आहे.हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येत आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. नाशिक शहरात दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करून शहरवासीयांना अस्सल हापूस आंबा मिळतो. यंदा मात्र कोरोनामुळे हा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. तसेच लॉकडाऊन काळात मालवाहतूक होत नसल्याने नाशिक शहरात आंबा आवक कमी प्रमाणात झाली होती. मात्र काही दिवसांपासून आता ग्राहकांसाठी आंबा उपलब्ध झाला आहे.
हापूस आंब्याची मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 12:00 AM