नांदूरवैद्य : तालुक्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे गावातील व परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या विविध तक्रारींचे निरसन होण्यासाठी एका सुसज्ज रुग्णालयाची गरज असल्यामुळे गोंदे दुमाला येथील सरपंच शरद सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य व इतर ज्येष्ठ नागरिकांनी धामणगाव येथील एसएमबीटीचे प्रशासकीय अधिकारी डॉ. नाईक यांची भेट घेतली.इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे अनेक कारखाने असून, येथे रोजगारासाठी व आपला उदरनिर्वाह करण्यासाठी दूरवरून हजारो नागरिक स्थायिक झाले आहेत. धामणगाव येथे असलेले एसएमबीटी प्रशासनाचे रुग्णालय गोंदे दुमाला गावापासून २५ ते ३० किलोमीटर दूर असल्यामुळे या ठिकाणी रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाण्यास विलंब होतो. येथे जाण्यासाठी वाहनांची सुविधा नसल्याने रुग्ण जाण्यास इच्छुक नसतात. तसेच गावात व परिसरात नाशिकशिवाय कुठेही सर्वसुविधांयुक्त असे रुग्णालय नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना नाशिकला जावे लागते. यामुळे नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. चर्चेसाठी एसएमबीटीचे प्रशासकीय अधिकारी डॉ. नाईक, एसएमबीटीच्या अधिकारी पौर्णिमा इंगळे, सरपंच शरद सोनवणे, गणपत जाधव, शांताराम जाधव, उपाध्यक्ष रामदास नाठे, गोपाल नाठे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम बेंडकुळे, नीलेश नाठे, विकास कार्यकारी संस्थेचे माजी अध्यक्ष दौलत सोनवणे, कचरू नाठे, देवराम नाठे, चंदू सोनवणे, मोहन नाठे, तुकाराम नाठे, रामभाऊ नाठे, कारभारी नाठे, निवृत्ती नाठे, परमेश्वर नाठे, सामाजिक कार्यकर्ते मधु नाठे, ज्ञानेश्वर नाठे, नंदू नाठे व इतर ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.गोंदे दुमाला येथे औद्योगिक वसाहत असल्यामुळे या परिसरातील गावांच्या व गोंदे गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने एक सर्व सुविधांयुक्त रुग्णालय व्हावे, अशी मागणी परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. धामणगाव येथील एसएमबीटीच्या प्रशासकीय अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासन यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. - शरद सोनवणे, सरपंच, गोंदे दुमाला
नांदूरवैैद्य परिसरात रुग्णालयाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 11:08 PM