शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

बागलाणच्या पश्चिम भागातील अवैध व्यवसाय रोखण्याची मागणी

By admin | Published: October 28, 2015 11:04 PM

ग्रामस्थांना त्रास : गावाची शांतता धोक्याततळवाडे

 दिगर : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील मोरकुरे या आदिवासी गावालगत हत्ती नदीकिनारी जुगाऱ्यांचे साम्राज्य वाढले असून, त्याचा त्रास परिसरातील ग्रामस्थांना होत असल्याने पोलिसांनी या जुगाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मोरकुरेचे सरपंच काळू धुमणे यांनी केली आहे.मोरकुरे गावालगत हत्ती नदीकिनारी गेल्या अनेक वर्षांपासून सर्रास जुगार खेळला जात असून, त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. परिसरातील तळवाडे, मोरकुरे, भवाडे, पठावे, चिंचपाडे, सारपाडे, मळगाव येथील तरुणांपासून तर वृद्धांपर्यंत जुगाराच्या विळख्यात सापडले असल्याने गावाची शांतता धोक्यात आली आहे. दोन-तीन दिवस मोलमजुरी करून जमविलेला पैसा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खर्च न करता जुगारावर खर्च केला जात असल्याने महिलावर्ग पुरता वैतागला आहे. त्यातच गावातील तरुणांमध्येही व्यसनांचे प्रमाण प्रचंड वाढल्याने गावामध्ये तंटे वाढत आहेत. एकेकाळी कृष्णाजी माउलींच्या कृपाशीर्वादाने वारकरी संप्रदायाकडे वळलेला तरुण सध्या सट्टा- जुगाराच्या विळख्यात गुरफटला जात आहे. तरुणांना यापासून वाचविण्यासाठी पोलिसांनी जुगार अड्यावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. (वार्ताहर)बागलाण तालुक्यातील मोरकुरे येथे सुरू असलेला जुगाराचा अड्डा.