कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती अधिकाधिक विकसित ठेवण्याचा प्रयत्न करण्यावर नागरिकांकडून भर दिला जात आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या, औषधांसह आयुर्वेदिक औषधींचाही वापर केला जात आहे. दरम्यान, तुळस ही बहुगुणी वनौषधी म्हणून ओळखली जाते. कोरोनापश्चात राहणारा अशक्तपणा घालविण्यासाठी शतावरीची पावडर दुधात मिसळून घेतल्यास नक्कीच फायदा होतो, असे वनौषधी अभ्यासक कुसुम दहिवेलकर यांनी सांगितले. कडुनिंबाची पाने वाफ घेताना पाण्यात टाकून घेतल्यास त्याचा फायदा कफ निवारणासाठी होतो.
---इन्फो--
या पाच रोपांना वाढली मागणी
तुळस - ही वनस्पती शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकणारे औषध आहे. तुळस ही प्रत्येकाच्या अंगणात असतेच. तुळशीची पाने सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यास त्याचा शरीराला नक्कीच फायदा होतो.
अश्वगंधा - शक्तिवर्धक आयुर्वेदिक वनौषधी आहे. या वनस्पतीचा वापर आयुर्वेदात प्रामुख्याने केला जातो. अश्वगंधा खोकला, दमा यासारख्या आजारातही गुणकारी ठरते. पोटासंबंधी विकारही या वनस्पतीच्या वापरामुळे दूर होतात.
गुळवेल - शरीरातील निरुपद्रवी घटक बाहेर टाकण्याचे काम गुळवेल करते. पित्त नियंत्रणात ठेवण्यासही या वनस्पतीचा उपयोग होतो. एकप्रकारे मानवी शरीराला आतील बाजूने स्वच्छ करणारी ही एकमेव वनस्पती आहे, असे आयुर्वेदात म्हटले जाते.
शतावरी- या वनस्पतीचे मूळ शक्तिवर्धक म्हणून वापरले जाते. अशक्तपणावर या वनस्पतीद्वारे सहज मात करता येते. मुळे व पानांचा औषधी वापर केला जातो. या वनस्पतीची काटेरी झुपकेदार वेल असते. व्हिटॅमीन-ए, बी, सी या वनस्पतीत आढळून येतात.
अडुळसा -प्रामुख्याने सर्दी, कफ, खोकला दमा यासह श्वसनसंस्थेच्या प्रत्येक तक्रारींवर हे रामबाण औषध आहे. श्वसनसंस्थेचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी अडुळसा ही वनस्पती रामबाण औषध आहे. या वनस्पतीच्या पानांचा रस अतिसारावर गुणकारी ठरतो. अडुळसा हे रक्तशुद्धीदेखील करणारे आयुर्वेदिक औषध आहे. आले आणि मधातून या वनस्पतीच्या पानांचा रस वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेतला जातो.
दमवेल- ही औषधी वनस्पती श्वसननलिकेशी संबंधित आजारांसह फुप्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. ही औषधी वनस्पती नैसर्गिकरीत्या जंगलात वेलवर्गीय स्वरूपात आढळून येते. आयुर्वेदात सांगितलेल्या दमा, अस्थमा या विकारांच्या औषधांमध्येही या वनस्पतीचा मोठा वापर होतो.
---कोट---
कोरोना काळात आयुर्वेदात सांगितलेल्या इम्युनिटी बुस्टर ठरणाऱ्या, तसेच सर्दी, खोकला, कफ यावर गुणकारी असलेल्या वनौषधींच्या रोपांना मागणी नक्कीच वाढली आहे. अत्यंत वाजवी दरात ही रोपे गरजूंकरिता उपलब्ध करून देत आहोत. मागील महिनाभरात तुळस, अडुळसा, अश्वगंधा यासारख्या रोपांची चौकशी, तसेच खरेदीवर नागरिकांकडून भर दिला जात आहे.
- चिरंतन पारेख, नर्सरी चालक
---
आयुर्वेदिक काढ्यावर लोकांचा विश्वास आजही टिकून आहे. त्यामुळे देशी प्रजाती, औषधी वनस्पतींना महिनाभरापासून मागणी वाढली आहे. रोपांची निर्मिती नर्सरीतच केली जाते. मागणीनुसार पुरवठा सध्यातरी करण्याचा प्रयत्न आहे. या काळात अत्यंत कमी दरात औषधी वनस्पतींची विक्री सामाजिक जबाबदारी समजून करीत आहोत. मी स्वत: निसर्गप्रेमी आहे. निसर्गाची सेवा म्हणून या व्यवसायाकडे वळलो.
- मनोज धावडा, नर्सरी चालक
-----
फोटो आर वर ०५नर्सरी नावाने सेव्ह आहे.
तसेच डमी फॉरमेट आर वर ०५प्लान्ट डिमान्ड न्युज डमी नावाने आहे.
===Photopath===
050521\05nsk_36_05052021_13.jpg
===Caption===
आयुर्वेदिक नर्सरी