शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 9:58 PM

मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या मागणीनुसार राज्य सरकारने आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सिन्नर : मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या मागणीनुसार राज्य सरकारने आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन आठ ते नऊ महिने होत आले तरी मराठा समाजाच्या प्रमुख आणि महत्त्वाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मंत्रिमंडळाने लक्ष घातलेले नाही. मागील सरकारने उच्च न्यायालयामध्ये टिकवलेले आरक्षण महाआघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात टिकवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे द्यावे, मराठा समाजाची व सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी दोन दिवसाचे अधिवेशन घ्यावे, सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाबाबत एकत्रित सुनावण्या घेण्याचा सरकारने आग्रह धरावा, आरक्षण वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या वकिलांना सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत सामील करून घ्यावे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, चळवळीत बलिदान देणाऱ्यांना आर्थिक मदत आणि वारसांना नोकरी द्यावी, मराठा विद्यार्थ्यांसाठी पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना सुरू करावी, मुलाखत झालेल्या मराठा उमेदवारांना नोकरीत सामावून घ्यावे आदींसह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी शिवसंग्राम संघटनेचे उपप्रमुख दशरथ खैरनार, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष मधुकर शिंदे, शिवसंग्रामचे तालुकाप्रमुख पंकज जाधव, युवक तालुकाध्यक्ष रोशन वाजे, उपाध्यक्ष निलेश कडभाने आदी उपस्थित होते.

टॅग्स :marathaमराठाreservationआरक्षण