लोकमत न्युज नेटवर्कऔंदाणे : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहाता बागलाणतालुक्यात रॅपिड टेस्ट योजना राबविण्यात यावी अशी मागणी तहसिलदार जितेद्र कुमार इंगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.तालुक्यातील कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे रूग्ण संख्येत ही लक्षणीय वाढ होत आहे. यासाठी आरोग्य विभागा मार्फ त शहरी व ग्रामीण भागात रॅपिड टेस्ट घेण्यात यावी. रॅपिड टेस्ट योजना वेळीच राबविली गेली तर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील बाधीत रूग्णांची अचूक संख्या आरोग्य विभागाला समजल्याने त्यासाठीच्या उपाययोजना त्वरीत राबविण्यात येवुन या आजाराला रोखण्यासाठी रॅपिड टेस्ट योजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष संजय देवरे, किशोर कोठावदे, राहुल सोनवणे, नरेश खरे, संदीप पवार, निर्मला भदाने, नीलेश पाकळे, भाऊसाहेब पानसरे आदींच्या सह्या आहेत..
रॅपिड टेस्ट योजना राबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 3:15 PM
औंदाणे : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहाता बागलाणतालुक्यात रॅपिड टेस्ट योजना राबविण्यात यावी अशी मागणी तहसिलदार जितेद्र कुमार इंगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ठळक मुद्देबागलाण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव