गणेशचौक भागत वाढत्या चोऱ्या तसेच परिसत असलेल्या बलोद्यानाची कायम होणारी नासधूस व साहित्य चोरी रोखण्यासाठी स्थानिक नागरिकांनी बैठक घेतली. यामध्ये बलोद्यानात महापालिकेने सीसीटीव्ही बसवावे व एन ८ सेक्टर मधील रहिवाशांतर्फे सीसीटीव्ही लावण्यात यावे असे ठरविण्यात आले. त्यानुसार विभागीय अधिकारी मयुर पाटील व शिवसेना महिला नगरसेवक कल्पना पांडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल घेत विभागीय अधिकारी पाटील व नगरसेवक पांडे यांनी उद्यान व परिसराला भेट देत पाहणी केली. या भागात पोलीस गस्त वाढवून, क्यूआर कोड बसवावे अशी मागणी छत्रपती सेनाचे तुषार गवळी, डॉ विशाल गवळी, पुंडलिक जगताप, तुषार जगताप, निवृत्ती वाघ , शरद गांगुर्डे, भूषण सावळे, राहुल आहेर, नारायण पवार, लीलाधर गवळी, सचिन खैरे आदींनी केली.
उद्यानात सीसीटिव्ही बसविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:16 AM