इंदिरानगर : वडाळागाव येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू करण्याची मागणी पूर्व प्रभाग सभापती ॲड. श्याम बडोदे यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे. वडाळागाव, मेहबूब नगर, सादिक नगर, मुमताज नगर, अण्णाभाऊ साठे नगरसह परिसरात सुमारे ७० टक्के हातावर काम करणाऱ्या नागरिकांची वस्ती आहे. नागरिकांच्या मागणीनुसार वडाळा गावात महापालिकेच्यावतीने महापालिकेची रुग्णालये बांधण्यात आली आहेत. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्रांचा लाभ घेतात. राजीवनगर, वडाळा गाव, मेहबूब नगर, राजीवनगरसह परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांना रॅपिड अँटिजेन टेस्टकरिता इतर ठिकाणी जावे लागते. वेळ जाऊन आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
आरोग्य केंद्रात अँटिजेन टेस्ट सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 11:46 PM