नाशिक : जिल्'ातील दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पश्चिमेकडे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी जलसंधारणाचे लहान मोठे प्रकल्प राबवून तसेच या बंधाऱ्यांतून हे पाणी बोगद्यातून वळण बंधाऱ्यात टाकून ते गिरणा-तापी खोऱ्यात सोडावे,अशी मागणी सुरगाणा-कळवणचे आमदार जीवा पांडू गावीत यांनी नागपूर विधानसभेच्या दुष्काळावरील चर्चेत केली. विधानसभेतील दुष्काळाविषयक चर्चेत आ. गावीत यांनी सहभागी घेऊन जिल्'ातील दुष्काळ निवारनार्थ विविध उपाययोजना मांडल्या. त्यात जिल्'ात नेहमीच ओला किंवा कोरडा दुष्काळ पडतो. दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पश्चिमेकडील वाहून जाणारे पाणी वळण बंधाऱ्यांद्वारे गिरणा व तापी खोऱ्यात सोडून ते पाणी गिरणा व जायकवाडी धरणासारखी अजून साठवण धरणे बांंधून द्यावे. तसेच हे पाणी दुष्काळग्रस्त कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतीसाठी द्यावे. तसेच दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी व शेतमजुर बांधवांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने बरोबरच त्वरीत दुष्काळी कामे सुरू करून, मागेल त्याला काम दिले पाहीजे. ही कामे प्रामुख्याने सिंचनाची असली पाहीजे. तसेच मजुराला वेळेवर व पुरेशी मजुरी मिळाली पाहीजे. कोणीही शेतमजुर अथवा शेतकरी गाव सोडून अन्यत्र कामे शोधण्यासाठी जाणार नाही,याची सरकारने काळजी घ्यावी व शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज घोषीत करावे,अशी मागणी आ. जीवा पांडू गावीत यांनी केली(प्रतिनिधी)
दुष्काळ निवारनार्थ पश्चिम नद्यांचे पाणी अडवा जीवा पांडू गावीत यांची मागणी
By admin | Published: December 12, 2014 1:44 AM