निवेदनात म्हटले आहे, इगतपुरी तालुका हा अतिवृष्टी प्रवण क्षेत्रात असल्याने पावसाचे प्रमाण भरपूर असते. या भागात अनेकदा वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. महिना महिना वीज नसते. त्यामुळे दिवाबत्तीसाठी रॉकेल गरजेचे आहे. भौगोलिक परिस्थिती पाहता या भागात जंगली श्वापदे, सरपटणारे प्राणी, आदींसह बिबट्यांची भीती कायम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अंधारात दिवा टेंभा लावण्यासाठीही रॉकेलची आवश्यकता असते. याकरिता प्रत्येक आदिवासी कुटुंबांना रेशन कार्डवर रॉकेल उपलब्ध करून द्यावे व आदिवासी कुटुंबांच्या विविध समस्या लोकप्रतिनिधींनी मांडून आदिवासी समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी बिरसा ब्रिगेड (सह्याद्री) संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल गभाले, वासाळीचे सरपंच काशिनाथ कोरडे, तालुका अध्यक्ष शरद बांबळे, आदी उपस्थित होते.
फोटो - ०९ बिरसा ब्रिगेड
बिरसा ब्रिगेड (सह्याद्री) संघटनेच्या वतीने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देताना काशिनाथ कोरडे, अनिल गभाले, शरद बांबळे, आदी उपस्थित होते.
090721\595209nsk_22_09072021_13.jpg
फोटो - ०९ बिरसा ब्रिगेड बिरसा ब्रिगेड ( सहयाद्रि ) संघटनेच्या वतीने तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देतांना काशिनाथ कोरडे, अनिल गभाले, शरद बांबळे आदी.