दि. ५ फेब्रुवारी रोजी दुष्काळी उपाययोजनाची अंमलबजावणी करावी या मागणीचे निवेदन दिले होते व त्याच वेळी तहसीलदार डॉ. मंडलिक यांच्याकडे दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ची नक्कल मराठीत मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र सदर माहिती प्रशासनाने दिली नाही म्हणून पुन्हा मंगळवारी (दि. १२) तहसीलदारांना निवेदन मनसेकडून देण्यात आले. दुष्काळी योजना फक्त कागदावरच राबविण्यात येत आहे का, असा संतप्त सवाल मनसेचे तालुकाध्यक्ष संपत बाबा वक्ते, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष विकास गोजरे, महिला आघाडीप्रमुख मंगला वडगे, वैशाली सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, भाऊसाहेब कलवर, श्रीहरी ठाकरे, रवींद्र बागुल, दत्तू वाढवणे यांच्या शिष्टमंडळाने यावेळी केला. दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मध्ये तयार करण्यात आली आहे. संहितेची मराठी आवृत्ती कोठे उपलब्ध नाही. सर्वसाधारण शेतकरीवर्ग ग्रामीण भागात राहतो. दुष्काळाच्या योजनेची माहिती सामान्य शेतकऱ्याला मराठी भाषेत वाचायला मिळाली तरच त्यांना त्यांचे हक्क समजू शकतील. मात्र त्यांना प्रशासकीय योजनांची माहिती सविस्तरपणे समजू नये म्हणून इंग्रजी भाषेचा खटाटोप आहे का, असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
दुष्काळ व्यवस्थापन संहितेची मराठी नक्कल देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 5:35 PM