ताहाराबाद ग्रामपंचायतीमध्ये चौदाव्या वित्तआयोगाच्या निधीत गैरव्यवहार झाला असून १५ टक्के दलित व आदिवासी आरक्षित निधी ,१० टक्के महिला बालकल्याण निधी ,५ टक्के दिव्यांग निधी आरक्षित असताना गेल्या पाच वर्षात या निधीचा वापरच झाला नसून त्यात गैरव्यवहार झाल्याचे निवेदनात म्हटले आहे .पाणीपुरवठा योजनेतही गैरव्यवहार झाला असून त्याची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे . ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल ,पेट्रोल पंप ,मोबाइल मनोरे ,मद्याची दुकाने ,व्यापारी संकुले यांची कर आकारणी शासनाच्या नियमानुसार होत नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे .ग्रामपंचायत हद्दीत नवीन बिगर शेती प्लॉट यांना ना हरकत दाखल देतांना शासनाच्या नियमांची ग्रामसेवकाकडून पायमल्ली केली जात आहे .तसेच ग्रामपंचायत बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुभाष नंदन ,कैलास नंदन ,गोविंद महाजन ,मधुकर महाजन,अशोक नंदन ,योगेश नंदन ,गणेश नंदन यांच्या सह्या आहेत .
ताहाराबाद ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 6:47 PM