नाशिक : सिडको परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला असून, त्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आंतरराष्टÑीय मानवाधिकार संघटनेच्या नाशिक शाखेतर्फे सिडको विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून अंबड, डीजीपीनगर २, चेतनानगर, राणेनगर आदी ठिकाणी मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून जाणे मुश्कील झाले आहे. पादचारी, वाहनधारक यांच्या अंगावर कुत्रे धावून येत असून, प्रसंगी चावण्याचाही प्रयत्न होत आहे. मोकाट कुत्र्यांच्या या उपद्रवामुळे नागरिकांना रस्त्यावर चालणेही मुश्कील झाले असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रसंगी राहुल पाठक, हर्षदा गुंजाळ, किरण जाधव, सुयश मेणे, पंकज जुंदरे, अलोक शुक्ला, सुप्रीम सोमराजन आदी उपस्थित होते.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:58 AM