प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना सन २०२०-२१ अंतर्गत नाशिक जिल्ह्याला मिळालेला लक्ष्यांक तालुक्यांना वितरित करण्यात आला. यात १९.९८ कोटी रूपयांपैकी २.२५ कोटी रूपये येवला तालुक्याला मिळाले. यात फक्त १३२२ अर्ज छाननीसाठी निवडले गेले असून १९०० अर्ज प्रतीक्षेत आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत व लाभार्थी अर्जाचा विचार करता २.२५ कोटी रूपये रक्कम तालुक्यासाठी फारच कमी आहे. सन २०२०-२१ मध्ये डीबीटी पोर्टलवर येवला तालुक्यातील ३२१६ अर्ज आले आहेत तर नाशिक जिल्हयात १४ हजार ४१८ अर्ज आले आहेत. लक्ष्यांकाचा विचार करता २२ टक्के म्हणजे ४ कोटी रूपये मिळणे अपेक्षित होते. सदर योजनेसाठी अजून २ कोटी रूपये येवला तालुक्याला मिळावे, अशी मागणी युवा नेते मकरंद सोनवणे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रश्नी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही सोनवणे यांनी सांगितले.
कृषी सिंचन योजनेसाठी अधिक निधीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:25 AM