आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांचा दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराज आश्रमात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. नरेंद्रगिरी पंचायती निरंजन आखाड्याचे प्रमुख महंत व अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष होते. काही वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वर तसेच चार महिन्यांपूर्वी हरिद्वारला झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात त्यांचा सहभाग होता. आखाडा परिषदेच्या अध्यक्षांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? त्यांच्या मृत्यूमुळे सर्वसाधारण साधुसंतांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे नरेंद्रगिरी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी शोकसभेत करण्यात आली. यावेळी कैलास मठाचे महंत संविदानंद सरस्वती, अनिकेतशास्त्री देशपांडे, पंचमुखी हनुमान मंदिर प्रमुख महंत भक्तीचरणदास, रामतीर्थ महाराज यांच्यासह साधू, महंत आणि आखाडा परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महंत नरेंद्रगिरी महाराजांच्या मृत्यूची चौकशी करण्याची शोकसभेत मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:16 AM