उमराणे : येथील तालुका बीजगुणन केंद्रात विविध शेतीउपयोगी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी येथील जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने निवेदनाद्वारे राज्याचे कृषिमंत्री दादाभुसे यांच्याकडे करण्यात आली.उमराणे येथे तालुका बीजगुणन केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून कृषी विभागाच्या माध्यमातून कार्यान्वित आहे. या केंद्राचे एकूण क्षेत्र ६७ एकर आहे. या केंद्रात पूर्वी सर्व प्रकारच्या फळझाडांच्या बागा होत्या. तसेच शेतीउपयोगी बि-बीयाणेची निर्मिती या केंद्रात मोठ्या प्रमाणावर केली जात होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या केंद्राचा फायदा होत होता.कालांतराने रोपवाटिका बंद होऊन रोपाची निर्मिती ठप्प झाली. परिणामी येथील फळबागा उध्द्वस्त होऊन बि-बियाणे निर्मिती बंद पडली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. सदर बीजगुणन केंद्राचे पुनर्जीवन होण्याची अत्यंत गरज आहे.येथील तालुका बीजगुणन केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत शाश्वत शेतीच्या बळकटीकरणासाठी सदर केंद्राचा विकास होणे गरजेचे असुन या ठिकाणी फळबागांची लागवड करणे, बंद पडलेली रोपवाटिका सुरु करून शेडनेट व पॉलीहाउसची निर्मिती करणे, माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळा सुरु करणे, डाळिंब तसेच सर्व प्रकारचे फळे-फुले व भाजीपाला बियाणे संशोधन केंद्र सुरु करणे बीजगुणन केंद्रासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी जवळील धरणातून पाईपलाईन करणे, शेतकºयांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी सुसज्ज मिटिंग हॉल बांधणे व कर्मचारी वर्गासाठी निवासी व्यवस्था तसेच विश्रामगृह बांधणे, त्याशिवाय संपूर्ण बीजगुणन केंद्राला संरक्षण भिंत बांधणे, कृषी सलग्न महाविद्यालय सुरु करून कसमादेना भागातील शेतकºयांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.कृषिधन विकासाची अद्यावत गो-शाळा तयार करणे, बीजगुणन केंद्राअंतर्गत रस्ते निर्माण करून स्वतंत्र वीजपुरवठ्याची सोय करणे, केंद्राअंतर्गत तयार केलेल्या बि-बियाण्याचा साठा करण्यासाठी वेअर हाउस बांधकाम करणे, बीजगुणन केंद्रासाठी लागणारे शेतीउपयोगी अवजारे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अशा मागण्यांचे निवेदन कृषिमंत्री दादा भुसे यांनाआले.
उमराणे बीजगुणन केंद्रात शेतीविषयक सुविधा उपलब्ध करु न देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 6:08 PM
उमराणे : येथील तालुका बीजगुणन केंद्रात विविध शेतीउपयोगी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी येथील जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने निवेदनाद्वारे राज्याचे कृषिमंत्री दादाभुसे यांच्याकडे करण्यात आली.
ठळक मुद्देबीजगुणन केंद्रासाठी लागणारे शेतीउपयोगी अवजारे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.