बीएलओ मानधन तत्काळ अदा करण्यात यावे, ग्रामपंचायतीचे मागील दोन्ही निवडणुकीचे मानधन तत्काळ मिळावे, बीएलओ नेमणूक असणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीचे निवडणूक आदेश देऊ नये या मागण्यांचाही समावेश आहे. यावेळी राजपूत यांच्या समवेत शिक्षक भरतीचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र दिघे, तालुकाध्यक्ष यांनी चर्चा केली. जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायत निवडणुकीच्या मागण्यांसंदर्भात कळवण्याचे आश्वासन दिले. या मागणीनुसार उचित कार्यवाही करण्यात येईल, असेही तहसीलदार राजपूत यांनी सांगितले.
शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते अशोक शेवाळे, तालुका नेते रमेश चव्हाण, तालुकाध्यक्ष निलेश नाहिरे, सरचिटणीस भाऊसाहेब कापडणीस, कार्याध्यक्ष उमेश पवार, कार्याध्यक्ष शिवदास निकम, कोषाध्यक्ष अभिजित देसले, प्रवक्ते भीमराव मगरे, प्रसिद्धिप्रमुख संदीप पठाडे, मिलिंद पिंगळे, समीर मराठे सहभागी होते.