सिन्नर: कोरोनाच्या पाशर््वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने रेल्वे वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे उभ्या आहेत. या रेल्वेमध्ये आइसोलोशन हॉस्पिटल उभारण्याची मागणी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी रेल्वे मंत्रालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्वीटद्वारे केली आहे. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर महाराष्ट्रासह देश दुसऱ्या स्टेजमध्ये आहे. रु ग्णांची संभाव्य वाढ लक्षात घेता हॉस्पिटल कमी पडू नये यासाठी बंद रेल्वेमध्ये आइशोलेशन हॉस्पिटल उभारण्यात यावे असे वाजे यांनी म्हटले आहे. जेवढ्या रेल्वे बंद आहेत, त्यांच्या डब्यांमध्ये सदर हॉस्पिटल उभारता येणे शक्य आहे. यासाठी कोणतेही कंस्ट्रक्शन न करता हे शक्य होणार असल्याचे म्हटले आहे. बेड, कंपार्टमेंट, टॉयलेट रेल्वेमध्ये सर्व उपलब्ध आहे. त्यामुळे याठिकाणी सोल्युशन हॉस्पिटल उभारावे असे वाजे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि रेल्वे मंत्रालयाला सदर ट्वीट टॅग करण्यात आले आहे. वाजे यांनी शुक्र वारी सदर ट्विट केले आहे.
रेल्वेमध्ये आइसोलोशन हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 2:18 PM