---
जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याची मागणी
मालेगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेने कर्ज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बँकेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांच्याकडे टेहरे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन धर्मा शेवाळे, लुल्ले विकास सोसायटीचे चेअरमन विनोद चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडून शेतकऱ्यांना स्थानिक विकास सेवा संस्थांतर्फे पीककर्ज उपलब्ध करून दिले जाते. शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करून देखील सन २०२१-२२ च्या खरीप हंगामासाठी पात्र शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा, तालुक्यातील सहकारी सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांचे शेअर्स आहेत. भांडवल अनेक वर्षांपासून अडकले आहे. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांसाठी व कृषी धोरणांसाठी स्थापन झाली आहे. जिल्हा बँक व प्रशासन नियमांना धरून धोरणे अवलंबत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. शेतकरी हिताचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना तातडीने कर्ज पुरवठा करावा, अशी मागणी चेअरमन शेवाळे, चव्हाण, समाधान चव्हाण, विकास सूर्यवंशी, भाऊसाहेब चव्हाण, सुकदेव जाधव, राहुल चव्हाण आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो फाइल नेम : १० एमजेयुएन ०१ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, या मागणीचे निवेदन बँकेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांना देताना विनोद चव्हाण, समाधान चव्हाण, विकास सूर्यवंशी, भाऊसाहेब चव्हाण, सुकदेव जाधव, राहुल चव्हाण आदी.
----
यंत्रमाग मजूर व मुकादमांना घरकुले देण्याची मागणी
मालेगाव : शहरालगतच्या म्हाळदे शिवारातील घरकूल योजनेत पात्र लाभार्थींना घरकुले वाटप झाल्यानंतर उर्वरित घरे यंत्रमाग मजूर व मुकादमांना द्यावीत, अशी मागणी शहर-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. महापालिका क्षेत्रातील म्हाळदे व सायने शिवारात केंद्र व राज्य शासन पुरस्कृत घरकूल योजना राबविण्यात आली आहे. १६ हजार ५०० घरे बांधून तयार आहेत. महापालिकेने रस्त्यावरील झोपडपट्टी, नदी किनाऱ्यावरील झोपडपट्टी, विकास आराखड्यातील आरक्षणावरील सरकारी जागेवरील झोपडपट्टीधारकांना घरकुलांचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पात्र लाभार्थींचे सर्वेक्षण करून आतापर्यंत १८०० लाभार्थी घरकूल योजनेसाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित रिकामी घरे यंत्रमाग मजूर व मुकादमांना राहण्यासाठी द्यावीत, अशी मागणी शेख यांनी केली आहे.
फोटो फाइल नेम : १० एमजेयुएन ०२ . जेपीजी
फोटो कॅप्शन : म्हाळदे व सायने घरकूल योजनेतील घरकुले यंत्रमाग मजूर व मुकादमांना द्यावीत, या मागणीचे निवेदन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांना देताना माजी आमदार आसिफ शेख.
----
===Photopath===
100621\10nsk_2_10062021_13.jpg~100621\10nsk_3_10062021_13.jpg
===Caption===
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.~फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.