दिंडोरी : तालुक्यातील परमोरी ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराची व कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. याकामी परमोरी येथील युवकांचा पाठपुरावा सुरू असून, या प्रकरणात ग्रामसेवक दोषी आढळूनही त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत प्रशासन टाळाटाळ करत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय सदर युवकांनी व्यक्त केला आहे. कठोर कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.याबाबत परमोरी येथील तरु ण सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. मात्र येथील ग्रामसेवक चौकशी व कारवाई टाळण्यासाठी संबंधित युवकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे युवक सांगत आहे. सदर प्रकरणी जि. प., प्रांत, तहसील, पंचायत समिती, पोलीस ठाणे आदि ठिकाणी निवेदने देण्यात आली आहेत.याविरोधात येथील युवकांनी उपोषण करण्याचा व ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचा इशारा दिला होता; मात्र प्रशासनाने मध्यस्थी करत सदर प्रकरणाची चौकशी करत संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. (वार्ताहर)येवला : अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई सोनवणे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शासनाच्या कला संचालनालयच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत यश संपादन केले.
परमोरी ग्रामपंचायतीच्या चौकशीची मागणी
By admin | Published: March 08, 2016 10:51 PM