जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२१ साठी लागू करण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी १५ जुलैची मुदत देण्यात आली आहे. पीकविमा योजनेकरिता खरीप ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस व मका पिकांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना शेतमालाच्या अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई सामूहिक स्वरूपात मिळावी, या उद्देशाने ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी, लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय राहणार आहे. सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल, तर विमा संरक्षण देय राहणार आहे.
पीकविम्याची रक्कम अदा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:11 AM