सिन्नर तालुका ब्रास बॅण्ड असोसिएशनच्या वतीने तालुक्यातील वावी येथे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शेख मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष रोहित सरवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यात पदाधिकाऱ्यांसह सभासदांनी ही मागणी केली. निर्बंधामुळे हा व्यवसाय संपूर्णत: मोडीत निघाला असून, या व्यवसायाच्या माध्यमातून त्यावर उपजीविका असणाऱ्या कलाकारांची आर्थिक कुचंबणा होत आहे. तहसीलदार व संबंधित यंत्रणेला निवेदन देऊन सुध्दा कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याची खंत यावेळी असोसिएशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली. कर्जाचे ओझे डोक्यावर घेऊन वर्ष लोटले असून, आता तरी शासनाने किमान दहा लोकांना परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेचे तालुकाध्यक्ष रोहित सरवार यांनी केली आहे. सरचिटणीस दीपक खरात, मधुकर माळी, योगेश दौंड, राजू पटेल, सोमनाथ मेंगाळ, अन्सार शेख, संतोष उघडे, काळू घेगडमल आदींसह ५०-६० चालक-मालक व कलाकार उपस्थित होते.
--------------------------
‘राज्यात जरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी काही व्यावसायिकांना अटी-शर्ती घालून परवानगी दिली. तशीच आम्हाला किमान दहा लोकांना तरी परवानगी द्यावी. त्यामुळे वर्षभरापासून घरीच बसलेल्या कलाकारांना निदान कुटुंबाचा उदरनिर्वाह तरी भागवता येईल.
दीपक खरात, सरचिटणीस