नाशिक : कोरोनाची पार्श्वभूमी व लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला आहे . लॉकडाऊनमधील ऑनलाइन शिक्षणामुळे थेअरी व प्रॅक्टिकल ही विद्यार्थ्यांचे होऊ शकलेले नाहीत. असे असतानाही महाराष्ट्र सरकारने एमबीबीएस चा परीक्षा ७ डिसेंबरपासून घेण्याचे घोषित केले आहे. या नियोजित परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलण्याची मागणी अभाविपने केली आहे. संबंधित परीक्षा अभ्यासक्रम पूर्ण करून फेब्रुवारी २०२१ मध्ये घेण्यात याव्यात, असे आवाहनही अभाविपचे प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
एमबीबीएस प्रथम वर्ष परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 4:24 AM