नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात कंत्राटी पद्धतीने साफसफाईचे काम करणाऱ्या मेहतर, वाल्मीकी, दलित समाजातील कामगारांना महापालिकेच्या नोकरभरतीत प्राधान्य देण्याची मागणी मेहतर, वाल्मीकी, दलित समाज युवा समितीच्या वतीने उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, सिंहस्थ पर्वणी काळात कंत्राटी पद्धतीने काम करताना कामगारांनी गोदाघाट, तसेच तपोवन परिसर स्वच्छ ठेवला होता. मात्र, कंत्राटीची मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा परिसर अस्वच्छ बनला आहे. महापालिकेमार्फत आता रोजंदारीवर नोकरभरतीचा प्रस्ताव चर्चेला आला आहे. सदर भरतीत सिंहस्थात काम केलेल्या कामगारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी ईश्वर घलोत, सुनील घलोत, आकाश गांगुर्डे, योगेश कल्याणी, सागर जाधव, सचिन गायकवाड व उमरवाल यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
सिंहस्थातील कामगारांना प्राधान्य देण्याची मागणी
By admin | Published: November 30, 2015 10:52 PM