नाशिक : चोरीचे सोने खरेदी केल्याची धमकी देत शहरातील प्रसिद्ध आऱ एल़ ज्वेलर्स या सराफी व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी खंडणी मागणाºया तोतया रेल्वे पोलीस अधिकाºयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या एका महिला चोरट्याने दिलेल्या माहितीनुसार या खंडणी मागितल्याचे या तोतया अधिकाºयाने सांगितल्याचे फिर्यादित म्हटले आहे़शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावर आऱ एल़ ज्वेलर्स सराफी मॉल असून, संचालक भवरलाल पुखराज चोपडा (५६, रा. कॉलेजरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ८ ते ९ आॅगस्ट या दरम्यान नेहेमीप्रमाणे काम करीत होते़ त्यांच्या मोबाइलवर ९९३०९९३७९६ या मोबाइल क्रमांकावरून फोन केलेल्या व्यक्तीने रेल्वे पोलीस निरीक्षक बोलत असल्याचे सांगितले. तसेच एक महिला चोर पकडली असून, तिने चोरलेले दागिने तुमच्या दुकानात विकल्याची कबुली दिली असून हे प्रकरण मिटविण्यासाठी धमकावणीच्या स्वरूपात खंडणीची मागणी केली़तोतया रेल्वे पोलीस निरीक्षक सतत दोन दिवस मोबाइलवरून खंडणीची मागणी करीत असल्याने चोपडा यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून संशयिताविरोधात खंडणीची मागणी केल्याची फिर्याद दिली़
पोलीस निरीक्षकाच्या नावाने ज्वेलर्सकडे खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 8:54 PM