लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गंगापूर रोडवरील मिठाई विक्रेत्यास अन्न व औषध विभागातून बोलत असल्याचे सांगून एका संशयिताने तुमच्याविरोधात तक्रार आली असून, ती मिटविण्यासाठी खंडणीची मागणी केल्याचे समोर आले आहे़गंगापूर रोडवरील मिठाई विक्रेते सूरज काळे यांना संशयित सूरज सुरेश काळे (रा़ सोलापूर) याने मोबाइलवर कॉल केला़ वान्द्रे येथील अन्न व औषध विभागातून बोलत असल्याचे सांगून आपल्याविरुद्ध मंत्रालयाकडून तक्रार आली असून, ती मिटविण्यासाठी सर्वप्रथम ५० हजार रुपयांची मागणी केली़ यानंतर चौधरी यांच्या भावासोबत फोनवर बोलून तक्रार मिटविण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केली़याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सोलापूर येथील संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मिठाई विक्रेत्याकडून खंडणीची मागणी
By admin | Published: June 23, 2017 5:09 PM