नाशिक : रेशन दुकानातून शिधापत्रिकाधारकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी जनवादी महिला संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सध्या सणासुदीचे दिवस असून, पुरवठा खात्याच्या निष्काळजीपणाने रेशन दुकानांना पुरेसा धान्याचा साठा होत नाही, त्यामुळे नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. अगोदरच महागाईमुळे नागरिक मेटाकुटीस आलेले असताना त्यात अन्नधान्य मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली असल्याने प्रत्येकाला दोन रुपये दराने ३५ किलो धान्य द्यावे, दहा लिटर घासलेट, डाळींचा स्वस्त दरात पुरवठा करावा, रवा, मैदा, तूप, तेल रेशनवर उपलब्ध करून द्यावे, रेशन घोटाळा करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, आदि मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी वसुधा कराड, मनीषा देशपांडे, सिंधू शार्दुल, मंगला पाटील, श्रीधर देशपांडे, तानाजी जायभावे, किसन ठोंबरे, शारदा कदम आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रेशन मागणीसाठी जनवादी महिला संघटनेचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2015 10:35 PM