नाशिक : राज्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या विविध प्रलंबीत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधीमंडळावर राज्यस्तरीय मोर्चा काढण्याची तयारी अंतीम टप्प्यात आलेली असताना राज्याचे पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी मात्र रेशन दुकानदारांच्या मागण्या अव्यवहार्य, अवाजवी व वस्तुस्थितीला नसल्याचे ठरवून मोर्चा मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तथापि, रेशन दुकादार मात्र आपल्या मागण्या वास्तव ठरवून कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढण्यावर ठाम आहेत.सोमवार दि. १९ मार्च रोजी आॅल महाराष्टÑ फेअर प्राइज शॉपकिपर्स व हॉकर्स परवानाधारक फेडरेशनने आझाद मैदान ते विधीमंडळापर्यंत महामोर्चाचे आयोजन केले असून, त्याची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. त्यासाठी रेशन दुकानदार संघटनांनी राज्यभर मेळावे, बैठका घेवून वातावरण निर्मिती केली आहे. असे असताना मोर्चाच्या पुर्वसंध्येला पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी संघटनेला पत्र देवून पुरवठा खात्याने आजवर रेशन दुकानदारांच्या हिताच्या घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यात प्रामुख्याने रेशन दुकानदारांना धान्य वाहतुकीच्या दरात ७३ टक्के वाढ केल्याचे तसेच दुकानदारांना व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती दिली आहे. रेशन दुकानातून खुल्या बाजारातील गहू, तांदुळ, खाद्यतेल, पामतेल, कडधान्य,डाळी, गुळ, शेंगदाणे, रवा, मैदा, चणापीठ व भाजीपाला विक्रीची परवानगी दिल्याचे म्हटले आहे. गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले प्रमाणित बी-बियाणे स्थानिक ठिकाणीच उपलब्ध व्हावेत यासाठी कृषी विभागाच्या परवाना प्राप्त प्रमाणित बी-बियाणे विक्रीसाठी ठेवण्याची अनुमती दुकानदारांना दिल्याचे म्हटले आहे. रेशन दुकानातून पॉस मशिनद्वारे होणाºया अन्नधान्य वितरणासाठी अधिकृत दुकानदारांच्या मार्जिनमध्ये ७० रूपयांवरून १५० रूपये प्रतिक्विंटल वाढ केली आहे. फ्री सेल केरोसिन तसेच ५ किलो ग्रॅमचे लहान सिलींडर्स यांचे वितरण करण्यास रास्तभाव व केरोसिन विक्रेत्यांना परवानगी दिली आहे. मुंबई व ठाणे शिक्षावाटप क्षेत्रातील दुकानदारांना महानंदाचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी परवानगी दिली आहे.राज्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीचे संगणकीकरण करून ई-पॉस मशिनद्वारे धान्य वाटप करण्याची पारदर्शक कार्यवाही सुरू आहे. हे करीत असताना राज्यातील रेशन दुकानदारांच्या बाबत शासन संवेदनशील असून, त्यांच्या हितासाठी शासनाने वेळोवेळी उपरोक्त निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या मागण्या अव्यवहार्य, अवाजवी व वस्तुस्थितीला धरून नसल्याचे बापट यांनी म्हटले आहे.
रेशन दुकानदारांच्या मागण्या अव्यवहार्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 3:14 PM
सोमवार दि. १९ मार्च रोजी आॅल महाराष्टÑ फेअर प्राइज शॉपकिपर्स व हॉकर्स परवानाधारक फेडरेशनने आझाद मैदान ते विधीमंडळापर्यंत महामोर्चाचे आयोजन केले असून, त्याची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे. त्यासाठी रेशन दुकानदार संघटनांनी राज्यभर मेळावे, बैठका घेवून वातावरण निर्मिती केली आहे.
ठळक मुद्देगिरीष बापट : मोर्चा काढण्यावर दुकानदार ठामविधीमंडळावर राज्यस्तरीय मोर्चा काढण्याची तयारी अंतीम टप्प्यात