सटाणा : बागलाण तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट गडद झाले आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असून खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. पावसाने दडी मारल्यास रब्बीच्या सुद्धा आशा मावळणार आहेत. या गंभीर परिस्थितीचा विचार करून शासनाने बागलाण तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीची माहिती मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार चव्हाण यांच्या भेटी दरम्यान दिली. यावेळी सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. शासनाने या सर्व गंभीर परिस्थितीचा विचार करून बागलाण तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा व सर्व प्रकारच्या दुष्काळी सेवा - सुविधा आणि लाभ देऊन जनतेला दिलासा द्यावा अशी आग्रही मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाºयांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.अजूनही टॅँकरद्वारेच पाणीपुरवठादोन महिने उलटूनही बागलाण तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी तालुक्यात सर्व पेरण्या देखील झालेल्या नसून पावसाने ओढ दिल्याने केलेल्या पेरण्या धोक्यात आलेल्या आहेत. विहिरींनी देखील तळ गाठल्याने शेतकरी आर्थिक व अस्मानी संकटात सापडला आहे. शेतातील उभी पिके करपून चालली असून दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. यामुळे शेतकºयांचे भांडवल वाया जाणार आहे. तालुक्यातील धरणातही पुरेसा पाणीसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे गावकºयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक गावात अजूनही टॅँकरद्वारा पाणीपुरवठा सुरु आहे.
बागलाण दुष्काळी तालुका जाहीर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:50 AM