खंबाळे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणाचे ओव्हरफ्लो पाणी खंबाळे परिसरातील बंधारे भरण्यासाठी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.भोजापुर धरणाचे ओव्हरफ्लो पाणी येथील व परिसरातील बंधाऱ्यांना सोडण्याची मागणी येथील शेतकºयांनी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याकडे केली आहे. खंबाळे गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना, आबालवृद्धांना रानोरान भटकंती करावी लागत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाºयाचा प्रश्न पशुपालकांना पडला आहे.भोजापूर धरणाचे ओव्हरफ्लो पाणी खंबाळे परिसरातील बंधारे भरण्यासाठी सोडले असता येथील पिण्याच्या पाण्याची सोय होईल. पंचवीस वर्षांपूर्वी खंबाळे गावातील सव्वाशे हेक्टर क्षेत्राला आवर्तन मिळत होते. त्यानंतर दरवर्षी भोजापूर धरणातील पूरपाणी खंबाळे गावाला सोडण्यात येत होते; पण यावर्षी धरणातून सोडण्यात आलेले ओव्हरफ्लो पाणी हे खरिपाच्या आवर्तनासाठी सोडण्यात आल्याचे समजते. भोजापूरचे पूरपाणी लाभक्षेत्रातील गावांना न मिळाल्याने खंबाळे येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. खंबाळे गावातील व परिसरातील पाणीटंचाई लक्षात घेता पाटबंधारे विभागाने या भागात धरणातील पूरपाणी सोडावे अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल.शेती ओस पडलीवर्षानुवर्षे दुष्काळाच्या छायेखाली असलेल्या खंबाळे गाव व परिसरात यावर्षी मात्र पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. परिसरातील शेती व्यवसाय पावसाअभावी ओस पडला आहे. यंदा खंबाळे गावातील पेरण्या वेळेवर न झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. परिसरातील बंधारे, पाझर तलाव, केटीवेअर कोरडेठाक पडले आहेत.
भोजापूरचे पूरपाणी खंबाळे परिसरात सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 12:07 AM
खंबाळे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणाचे ओव्हरफ्लो पाणी खंबाळे परिसरातील बंधारे भरण्यासाठी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भोजापुर धरणाचे ओव्हरफ्लो पाणी येथील व परिसरातील बंधाऱ्यांना सोडण्याची मागणी येथील शेतकºयांनी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याकडे केली आहे. खंबाळे गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना, आबालवृद्धांना रानोरान भटकंती करावी लागत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाºयाचा प्रश्न पशुपालकांना पडला आहे.
ठळक मुद्देपावसाचे प्रमाण कमी : पेरण्या वेळेवर न झाल्याने शेतकरी चिंतातुर