मालेगाव : अत्यल्प पावसामुळे खरीप पाठोपाठ रब्बी हंगाम देखील यंदा वाया गेला असून फळबागा जगविण्यासाठी किमान चणकापूरचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.हरणबारी धरणाचे आवर्तन सिंचनासाठी सोडण्यात आल्याने मोसम खोरञयास दिलासा मिळाला आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात का होईना या आवर्तनामुळे सुटणार आहे. मालेगाव, सटाणा व देवळा तालुक्यात पाण्याअभावी खरीप पाठोपाठ रब्बी हंगाम वाया गेल्यात जमा आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे फळबागा जगविण्याची धडपड शेतकºयांमध्ये केली जात आहे. चणकापूरचे किमान एक आवर्तन सिंचनासाठी सोडल्यास डाळिंब, पेरू, बोर, आवळा आदि फळबागा शेतकºयांना वाचविता येणार आहे. पाणी न मिळाल्यास लाख मोलाच्या या बागा नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.चणकापूरचे आवर्तन मालेगावसह दाभाडी, बारागाव योजनेस पिण्यासाठी सोडण्यात आले; मात्र आवर्तन सोडण्यात आल्यानंतर वीज वितरणतर्फे कालव्यावरील सर्व कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात येवून शेतकºयांची कोंडी केली गेली. विकतचे पाणी घेवून फळबागा जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. कर्जबाजारी शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नाही. वास्तव पिण्याच्या पाण्याबरोबरच पाटबंधारे विभागाने सिंचनासाठी पाणी सोडत या भागातील फळबागधारक शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ. पवार यांच्यासह जगदीश पवार, संदीप पवार, अनिल पवार, दादा हिरे, सतिष पवार, गोकुळ म्हसदे आदिंनी केली आहे.
चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात आवर्तन सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 5:42 PM