लासलगांव : निफाड तालुक्यात दुष्काळजण्य परिस्थिति असून जिल्ह्यातील सर्वात कमी पावसाची नोंद निफाड तालुक्यात झाली आहे. यासाठी ओझरखेड कालव्याला लवकरात लवकर पाणी सोडावे जेणेकरून पूर्व भागातील गाव पिण्याचे पाण्याचा प्रश्न आणि शेवटची पिके वाचतील जेणेकरून येणाऱ्या वर्षात शेतक-यांना आर्थिक उतपन्न चांगले राहील या मागणीचे निवेदन पालखेड कालवा मुख्य अभियंता राजेंद्र भाट यांना देण्यात आले. ओझरखेड कालव्यावरील शिरवाडे, वावी,सावरगाव,सरोळे खडक माळेगाव खानगाव वनसगाव,थेटाळे, कोटमगाव,टाकळी विंचूर, पिंपळद,वाळकेवाडी, वाहेगाव ,वाकी आदी गावांत पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला सुरु वात झाली आहे. जी काही थोडी फार पिके पावसाच्या भरोसा वर केलेली होती तिही जळण्याच्या मार्गावर असून विहिरींनी तळ गाठलेला आहे. जनावरांना चा-याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे ओझरखेड कालव्याचे आवर्तन सोडण्यात यावे, जेणेकरून पूर्वभागातील कालवा लाभक्षेत्रात त्याचा फायदा होईल. या मागणीचे निवेदन पालखेड विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता राजेंद्र भाट यांना देण्यात आले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, खडक माळेगाव सरपंच दत्ता रायते ,कोटमगाव सरपंच तुकाराम गांगुर्डे, ब्राह्मणगाव सरपंच मंगेश गवळी, माजी सरपंच बाळासाहेब रायते, उपसरपंच राजेंद्र रायते, चेअरमन शंकर शिंदे, ईश्वर शिंदे, संतोष बोराडे, माधव शिंदे, संतोष गोराडे, रवींद्र पाचोरकर, पंढरीनाथ पवार, निलेश शिंदे, बंडु शिंदे, धनंजय काळे, मुकुंद काळे, नंदू काळे आदींसह परिसरातील गावांच्या पाणीवापर संस्थांचे चेअरमन, सोसायटी चेअरमन ,सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
ओझरखेड कालव्याचे आवर्तन सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 1:10 PM