कोकणगाव : पिंपळगाव टोल नाक्याजवळ अनधिकृतपणे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लागले जात असल्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडण्याबरोबरच शेजारील शेतक-यांच्या द्राक्षबागांचे नुकसान होत असल्याची तक्रार स्थानिक शेतक-यांनी टोल प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, टोलनाक्या शेजारी चहाच्या गाड्यांसह खाद्यपदार्थांचे स्टॉल लागत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्याचा त्रास आजूबाजूच्या शेतक-यांना होतो. याचबरोबर शेजारील शेतक-यांच्या द्राक्षबागेचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते. तार कंपाउंड तोडून द्राक्ष बागेचे नुकसान केले जाते. गाड्या उभ्या करून दारु च्या बाटल्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या व ग्लास मोठ्या प्रमाणात टाकले जातात. त्याचा शेतीवर परिणाम होत असतो. याशिवाय परिसरात अवैध व्यवसायही चालतात. त्यांना समजावण्यास गेले असता त्यांच्याकडून स्थानिक शेतक-यांना दमदाटी केली जाते. बºयाचदा शेताच्या बांधावर नैसर्गिक विधीही पार पाडले जातात. सदर स्टॉल व गाडे बंद करावे अशी मागणी करण्यात आली. सदर मागण्यांचे निवेदन महामार्ग प्राधिकरणचे खोडसकर यांच्याबरोबरच टोल मॅनेजर चौधरी यांनाही देण्यात आले. यावेळी चौधरी यांनी वरिष्ठांशी चर्चा करुन कार्यवाहीचे आश्वासन दिले.
पिंपळगाव टोलनाक्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 4:22 PM
शेतकऱ्यांचे निवेदन : कार्यवाहीचे आश्वासन
ठळक मुद्देशेतक-यांच्या द्राक्षबागांचे नुकसान होत असल्याची तक्रार