सायखेडा : पाऊस आणि चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी गोदाकाठची पाहणी करण्यासाठी आल्या असता नागरिकांनी गोदापात्रातील पानवेली काढण्याची मागणी केली.यावेळीपठारे यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आढावा घेतला. तसेच नागरिकांशी संवाद साधला. करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके यांनी सायखेडा व करंजगाव येथे गोदावरी नदीपात्रात अडकलेल्या पानवेली काढण्याची व करंजगाव पुलाला संरक्षक कठडे बसविण्याची मागणी प्रांत पठारे यांच्याकडे यावेळी केली. याबाबत प्रांत पठारे यांनी तत्काळ पाटबंधारे विभागाला निर्देश देऊन पानवेली काढण्याच्या सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार दीपक पाटील, पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप कराड, सायखेडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अडसूळ, मंडळ अधिकारी पी. पी. केवारे, विस्तार अधिकारी के. टी. गादड, करंजगावचे तलाठी बी.ए. भोई, देशमुख, ग्रामविकास अधिकारी पी. पी. खैरनार, करंजगावच्या सरपंच अनिता भगुरे, सोमनाथ भगुरे, कैलास टिळे आदी उपस्थित होते.
गोदापात्रातील पानवेली काढण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 10:40 PM
पाऊस आणि चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी गोदाकाठची पाहणी करण्यासाठी आल्या असता नागरिकांनी गोदापात्रातील पानवेली काढण्याची मागणी केली.
ठळक मुद्देप्रांताधिकाऱ्यांकडून पाहणी : आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी चर्चा